देशभरात येवला पैठणीचे मार्केटिंग केले जाईल – मंत्री छगन भुजबळ

0

येवला : येवला-लासलगाव मतदारसंघाच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचे व्हिजन मांडणाऱ्या वचननाम्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकाशन केले आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहरासाठी १.४० दलघमी पाणी उपलब्ध करुन देतानाच नादुरुस्त जलवाहिन्या बदलणे, वितरण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे. मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न मिटविण्यासाठी पार-गोदावरी प्रकल्प पूर्ण केला जाईल. गेल्या वीस वर्षात येवला-लासलगावचा कायापालट झाला असून यापुढील काळात विकासपर्वाला आणखी गती येणार असल्याचा ठाम विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. येथील संपर्क कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी या वचननाम्याचे प्रकाशन केले. यातून देशभरात येवला पैठणीचे मार्केटिंग केले जाईल. ग्राहकांना आकर्षित केले जाईल. याचा थेट आणि मोठा फायदा पैठणी व्यवसाय व उद्योगाला होईल. यावर आधारीत कारागीरांना सुगीचे दिवस येतील, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. याप्रसंगी अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे,अर्शद सिद्दीकी, अरुण थोरात, हुसेन शेख, राजश्री पहिलवान , वसंत पवार, मोहन शेलार, यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

त्याशिवाय शहरातील विविध समस्यासह  विविध बंधारे, कालवे, एस्केप गेट, तलाव आदींची कामे केली जाणार आहेत. आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, पायाभूत सुविधा, रेल्वे, रस्ते, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात पुढील पाच वर्षात अनेक कामे केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. पैठणी क्लस्टर कार्यन्वित करणे, रेशीम व्यवसायासाठी खुली बाजारपेठ निर्माण करणे, चिखलदरा आणि बारामतीच्या धर्तीवर रेशीम पार्क साकारणे, राष्ट्रीय पातळीवरील पैठणी फेस्टिव्हल आयोजित केला जाईल. त्यात विविध स्पर्धा, कार्यक्रम आदींचा समावेश असेल. असेही मंत्री छगन भुजबळ यांनी या वचननाम्यातून म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech