कुणबी राजा फाउंडेशनचा महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांना पाठिंबा कपिल पाटील,प्रमोद हिंदुराव यांचा पुढाकार

0

शहापूर – शहापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांना कुणबी राजा फाउंडेशनने पाठिंबा जाहीर केला असून कुणबी राजा फाउंडेशनचे उमेदवार गणेश केशव निरोगुडा यांनी दौलत दरोडा यांना पाठिंबा दिला आहे. ठाणे जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील तसेच प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या पुढाकाराने कुणबी राजा फाउंडेशन तर्फे ही भूमिका घेण्यात आली.

याबाबत कुणबी राजा फाउंडेशन तर्फे अध्यक्ष गुरुनाथ भोईर यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले असून त्यामध्ये शहापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये कुणबी राजा फाउंडेशन तर्फे गणेश केशव निरगुडा यांना उमेदवारी देण्यात आली होती तथापि भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुतीची विजयी पताका फडकवण्यासाठी माजी मंत्री कपिल पाटील तसेच प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदू राव यांनी आज कोणी राजा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढली. त्यामुळे कुणबी राजा फाउंडेशनने तसेच फाउंडेशनच्या उमेदवारांनी महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दौलत दरोडा यांची विजयाची शक्यता अधिक भक्कम झाली आहे.कुणबी राजा फाउंडेशनने घेतलेल्या या सामंजस्य पूर्ण भूमिकेबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी फाउंडेशनचे आभार व्यक्त केले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech