जगप्रसिद्ध सारंगीवादक पद्मविभूषण पं. राम नारायण काळाच्या पडद्याआड

0

मुंबई : जागतिक कीर्तीचे सारंगीवादक पंडित राम नारायण यांचा वारसा केवळ त्यांच्या असामान्य संगीत साधना व आविष्कार नव्हे तर गुरू म्हणूनही त्यांनी पुढील पिढीतील सारंगी वादकांना घडविले असे पद्मविभूषण पंडित राम नारायण यांचे वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. शासकीय सन्मानासह त्यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पंडित राम नारायण यांचा जन्म २५ डिसेंबर १९२७ रोजी उदयपूर, राजस्थान येथे झाला. ते ५० च्या दशकात मुंबईत आले आणि एकल सारंगी वादक म्हणून त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली. त्यांनी सारंगी वादनाच्या विविध शैली विकसित करून जागतिक स्तरावर कीर्ती मिळवली. लहान असल्यापासूनच त्यांना सारंगी बद्दल प्रेम वाटत होते. जसं जसे मोठे होत गेले तस तसे त्यांचे सारंगी बद्दलचे वेड वाढू लागले. त्यांच्या समर्पणामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध सारंगी वादक बनले. त्यांच्या सादरीकरणांनी जगभरातील प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायचे.

त्यांनी 1956 मध्ये कॉन्सर्ट सोलो आर्टिस्ट म्हणून काम केले. पुढे ऑल इंडिया रेडिओसाठीही त्यांनी काम केले. तसंच काही अल्बम सुद्धा त्यांनी रेकॉर्ड केले. त्यांनी 1964 साली आपले मोठे भाऊ चतुर लाल यांच्यासह अमेरिका आणि युरोप येथे पहिले आंतरराष्ट्रीय दौरे संगीतरसिकांसाठी संस्मरणीय ठरवले. पंडित राम नारायण यांचा वारसा केवळ त्यांच्या असामान्य संगीत साधना व आविष्कार नव्हे तर गुरू म्हणूनही त्यांनी पुढील पिढीतील सारंगी वादकांना घडवले. यात त्यांची कन्या श्रीमती अरुणा नारायण-कल्ले, नातू हर्ष नारायण व प्रसिद्ध सरोद वादक ब्रिजनारायण तसेच अनेक शिष्यांचा समावेश होतो. तरल सूर, भक्ती आणि अविरत साधना, तंत्रशुद्धपणा यांनी ओथंबलेली पंडितजींची तेजस्वी सारंगी कारकीर्द ‘न भूतो न भविष्यति’. पंडित राम नारायण यांचे संगीत पुढील पिढ्यांतील संगीतप्रेमींना प्रेरित आणि प्रभावित करत राहील. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. त्यात भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान, पद्म विभूषण पुरस्कार यांचा समावेश आहे.

पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते – राज्यपाल
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंडित राम नारायण यांनी आपल्या अद्भुत वादनातून सारंगी हे वाद्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी व स्वर्गीय आनंद देणारे होते. पंडित राम नारायण यांनी देश विदेशात अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले व आपले ज्ञान मुक्तहस्ताने वाटले. त्यांचे दैवी संगीत त्यांच्या पश्चात देखील शतकानुशतके कायम राहील. त्यांच्या निधनामुळे सारंगीतील एक पर्व संपले असल्याचे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

पंडित राम नारायण यांचं कार्य नेहमीच प्रेरणा देणारं ठरेल – मुख्यमंत्री 
राम नारायण याच्या निधनानं संगीत क्षेत्रातील एका महान कलाकारास आपण मुकलो आहोत. संगीत क्षेत्रातील नवनव्या कलाकारांना पंडित राम नारायण यांचं कार्य नेहमीच प्रेरणा देणारं ठरेल, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech