मुंबई : राज्यात विधानसभा निडणूकीची रनधूमाळी सुरू असतांना अचानक वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी राज्यभर पसरली त्यामुळे वंचित आता विधानसभा निडणूकीतून माघार घेणार की लढणार या विषया चिंतन सुरू होते, मात्र, या विषयाला पूर्ण: विराम मिळाला असून बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती बरी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अशातच पुण्यात अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भेटीचं कारण देखील सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीची मोठी तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अजित पवारांनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्याचबरोबर ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपुर्वी 31 ऑक्टोबरच्या पहाटे त्यांच्या छातीत वेदन होत असल्याने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पुण्यात अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली. काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीची मोठी तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अजित पवारांनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्याचबरोबर ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांनी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांनी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.