राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे अर्थात घोषणा पत्राचे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रवादीतील मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आलेल्या या घोषणा पत्रामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी आरपीआय व अन्य घटक पक्षांच्या महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीच्या या जाहीरनामेमध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार ऐवजी 21 00 रुपये देण्याची घोषणात करण्यात आली आहे . मात्र त्याचबरोबर महिला सुरक्षिततेसाठी सुमारे 25000 महिलांचा राज्याच्या पोलिस दलात समावेश करण्याचे मोठे आश्वासन देण्यात आले आहे.
त्याचबरोबर राज्यातील गोरगरीब बळीराजाला अर्थात शेतकऱ्यांना घसघशीत पाठबळ देण्याबरोबरच तरुणांच्या हाताला रोजगार जेष्ठ आणि वृद्ध पेन्शन धारकांना वाढीव पेन्शन सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर आळा त्याचबरोबर दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाद्वारे दर महिना दहा हजार रुपयांपर्यंतचे विद्यावे वेतन अशा विविध घोषणा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेसाठी केल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या घोषणा पत्रातील महत्त्वाच्या आणि लोकप्रिय घोषणा..
१. राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणींना आता दरमहा दीड हजार ऐवजी राज्य सरकार 2100 रुपये मानधन देणार.
2. राज्यातील महिला वर्गाच्या सुरक्षिततेसाठी राज्याच्या पोलिस दलात 25 हजार महिलांचा समावेश करण्यात येणार.
3. शेतकरी सन्मानार्थ योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 ऐवजी आता दरवर्षी पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा.
4. राज्यातील बळीराजाला पूर्णपणे चिंतामुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा.
5. राज्यातील लाखो वृद्ध पेन्शन धारकांना आता महिन्याला दीड हजार ऐवजी प्रति महिना 2100 रुपये पेन्शन देण्याची घोषणा.
6. राज्यातील तमाम महिला वर्गांना तसेच गृहिणींना महागाईची झळ बसू नये याकरिता अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर आळा घालण्यात येणार.
7. राज्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी 25 लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार. तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून दर महिन्याला दहा हजार रुपये विद्या वेतन देण्याची घोषणा.
8. राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत होण्यासाठी ग्रामीण भागात तब्बल 45 हजार नव्या पानंद रस्त्यांच्या निर्मितीची घोषणा.
9. राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांना आणि आशा कर्मचाऱ्यांना प्रति महिना पंधरा हजार रुपये वेतन देण्याची घोषणा.
10. वीजबिलात 30 टक्के कपात करून , सौर व अक्षय उर्जेला प्राधान्य देण्यात येणार.
11. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्यात येणार.
12. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसांच्या आत नवमहाराष्ट्र दृष्टिकोन जाहीर करण्यात येणार.
याबरोबरच महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार ज्या मतदारसंघांमधून उभे आहेत मतदार संघातील स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्याचप्रमाणे मतदार संघाचा कालबद्ध पद्धतीने सर्वांगीण विकास होण्यासाठी यावेळी प्रथमच मतदारसंघनिहाय स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.