मुंबई – झी मराठी या वाहिनीवर प्रेक्षकांना चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून लोकांना खळखळवून हसवणारे कॉमेडी किंग भाऊ कदम अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताना दिसणार आहेत. सयाजी शिंदे यांच्यानंतर आणखी एक सेलिब्रिटी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचारात दिसणार आहे. अजित पवारांची लाडकी बहीण योजना यासह विविध योजनांची माहिती भाऊ कदम प्रचार रॅलीत सहभागी होऊन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यभरात भाऊ कदम यांच्या प्रचार रॅलीच आयोजन केलं जाणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचंड चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता प्रत्येक पक्षानं प्रचाराचा धुरळा उडवला आहे. भव्य रॅली, जाहीर सभा यांसारखे अनेक फंडे राजकीय पक्ष प्रचारासाठी वापरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अनेक सेलिब्रिटीदेखील अनेक राजकीय पक्षांचा प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रवेश केला असून आता पक्षाच्या प्रचाराची धुरादेखील ते सांभाळताना दिसणार आहेत. अशातच, सयाजी शिंदेंपाठोपाठ आता प्रसिद्ध कॉमेडी किंग भाऊ कदम देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहे. कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ देऊन भाऊ कदम अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहेत…