तमिळ अभिनेते बालाजींचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन

0

चेन्नई – तमिळ अभिनेते डॅनियल बालाजी यांचे काल हृदयविकाराने निधन झाले. ते ४८वर्षांचे होते. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज चेन्नईतल्या पुरसाईवलकममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमी वयात त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने भारतीय सिनेसृष्टी बरोबरच त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. दिग्दर्शक मोहन राजा यांनी डॅनियल बालाजीला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. मोहन राजा यांनी म्हटले की, “खूपच दु:खद बातमी आहे. मी डॅनियलचा आदर्श समोर ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. माझ्यासाठी तो एक प्रेरणास्थान तर होतेच, पण सोबतच तो एक माझा चांगला मित्रदेखील होता. त्याच्यासोबत काम करणे ही माझी एक आठवणच आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech