तिरुपती मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदूच असावेत- बी.आर. नायडू

0

तिरुमला – आंध्रप्रदेशातील जगप्रसिद्ध बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हे हिंदूच असले पाहिजेत असे प्रतिपादन तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) बोर्डाचे नवे अध्यक्ष बी.आर. नायडू यांनी आज, गुरुवारी म्हंटले आहे. बालाजी मंदिरातील प्रसादात भेसळ आढळल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. तेव्हापासून बालाजी मंदिर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत आहे. बी.आर. नायडू म्हणाले की, भगवान व्यंकटेश्वराचे निवासस्थान असलेल्या तिरुमला येथे काम करणारे सर्व कर्मचारी हिंदू समाजातील असावेत. तिरुमला येथे काम करणाऱ्या इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घ्यावा, याविषयी सीएम चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेश सरकारशी बोलणार असल्याचेही नायडू यांनी सांगितले आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली हे आपले भाग्यच असून ही मोठी जबाबदारी दिल्याबद्दल बीआर नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे नायडूंनी आभार मानले आहेत. तसेच, त्यांनी आधीच्या जगन मोहन रेड्डी सरकारवर हल्लाबोल केला. वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तिरुमलामध्ये अनेक अनियमितता झाल्या होत्या. तिरुमला तिरुपती मंदिराचे पावित्र्य राखले गेले पाहिजे असे नायडू यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech