पंतप्रधान मोदी प्रचारासाठी 12 नोव्हेंबर रोजी पुण्यात येणार

0

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. शहर व जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 12 नोव्हेंबर रोजी येथील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (29 ऑक्टोबर) संपली आहे. त्यामुळे बंडखोरी केलेल्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न एका बाजूला सुरू आहेत. तर, दुसर्‍या बाजूला महायुती व महाविकास आघाडीकडून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभा आणि रोड शोचे नियोजन केले जात आहे. महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यभर सुमारे दहा सभा घेणार आहेत. त्यातील एक सभा पुणे शहर व जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ 12 नोव्हेंबर रोजी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्यादृष्टीने तयारी केली जात असल्याचे भाजप पदाधिकार्‍यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech