पुणे – पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. विद्यमान खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची तर शिवसेना (ठाकरे गटाचे) संजोग वाघिरे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र अद्याप बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा उमेदवार जाहीर झाला नाही. मात्र यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात माजी खासदार संजय काकडे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणजेच मोहोळ यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असल्याचे दिसते. याआधी दोन इच्छुक उमेदवारांनी प्रचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न सुरू केला आहे तसेच काँग्रेस पक्षातील नाराज मंडळींची नाराजी दूर करण्यासाठी केंद्रीय समितीला पाचारण करण्याची वेळ आली आहे.