भाजपची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

0

आतापर्यंत भाजपकडून १४५ जणांची घोषणा
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमित वानखेडे यांना देखील भाजपने आर्वी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात भाजपने साकोली मतदारसंघात अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भारती लवेकर यांना वर्सोवा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून काटोलमधून चरणसिंग बाबुलाल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. तर माळशिरसमध्ये राम सातपुते आणि शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांच्यात लढत होणार आहे. भाजपने आमदार सुरेश धस यांना देखील पुन्हा एकदा संधी दिली आहे.

आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) मेहेबूब शेख यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. मूर्तिजापूर – हरिश पिंपळे, कारंजा – सई डहाके, तिवसा – राजेश वानखडे, मोर्शी – उमेश यावलकर, सावनेर – आशीष देशमुख, नागपूर मध्य – प्रवीण दटके, नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले, नागपूर उत्तर – मिलिंद माने, चंद्रपूर – किशोर जोरगेवार, उमरखेड – किसन वानखेडे, देगलूर – जितेश अंतापूरकर, डहाणू – विनोद मेढा, वसई – स्नेहा डुबे, घाटकोपर पूर्व – पराग शाह, लातूर शहर – अर्चना चाकूरकर, कराड उत्तर – मनोज घोरपडे, पलूस-कडेगाव – संग्राम देशमुख, आर्णी – राजू तोडसाम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी आतापर्यंत भाजपकडून १४५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने पहिल्या यादीमध्ये ९९, दुसऱ्या यादीमध्ये २१ आणि तिसऱ्या यादीमध्ये २५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech