डॉ.थोरातांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य भोवले वसंतराव देशमुखांविरूध्द गुन्हा दाखल

0

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात विखे थोरात वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.संगमनेर तालुक्यात धांदरफळ येथे माजी खा.डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत आयोजित एका जाहीर सभेत तालु क्यातील ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी आ.थोरात यांच्या कन्या व युवा नेत्या डॉ.जयश्री थोरात यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवरून आक्षेपार्ह शब्दात वक्तव्य केले.या घटनेचे पडसाद उमटून काँग्रेस च्या कार्यकत्र्यांनी दांदरफळ येथे सभेच्या ठिकाणी विखे यांच्या समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड केली.या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तणावो वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान आक्षेपार्ह बेताल वक्तव्य करणार्या देशमुखांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी डॉ.जयश्री थोरात,माजी आ.डॉ.सुधीर तांबे,नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी रात्रभर संगमनेर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.त्यानंतर अखेरीस शनिवारी सकाळी वसंतराव देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र ही घटना घडल्यानंतर वसंतराव देशमुख पोलीसांच्या हाती लागू शकले नसल्याने त्यांना अटक होऊ शकलेली नाही.

दरम्यान धांदरफळ येथील सभेनंतर घडलेला हिंसाचाराचा प्रकार हा पूर्व नियोजित असल्याचा तसेच माजी खा.डॉ.सुजय विखे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार होता असा गंभीर आरोप जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व सुजय विखे यांच्या मातोश्री शालिनी विखे पाटील यांनी केवला आहे.हिंसाचार प्रकरणी देखील तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी शालिनी विखे यांनी केली आहे.धांदरफळ येथील सभेत वसंतराव देशमुख यांनी डॉ.थोरात यांच्याविषयी केलेले वक्तव्य निश्चितच आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे सांगून शालिनी विखे यांनी डॉ.विखे यांच्या धांदरफळ येथील सभेनंतर च्या हिंसाचाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech