महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जल्लोषात रॅली काढत चौथ्यांदा उमेदवारी अर्ज केला दाखल

0

*मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रताप सरनाईक यांनी भरला अर्ज* 

प्रताप सरनाईक विजयाच्या चौकरासाठी पुन्हा एकदा सज्ज

ठाणे – भव्य रॅली काढत १४६ ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग चौथांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हजारो कार्यकर्ते समर्थक, चाहत्यांच्या साक्षीने अर्ज दाखल केला. खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाणे लोकसभेतील सर्वात मोठा आणि दोन महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र असलेला १४६ ओवळा माजिवडा ही विधानसभा ओळखली जाते. चौथ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांनी १४६ ओवळा माजिवाडा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी वर्तकनगरमधील विहंग पाम क्लब येथून ढोलताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई टी २० लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांच्यासह सूना अनाहिता सरनाईक, डॉ. कश्मिरा सरनाईक संपूर्ण सरनाईक परिवार उपस्थित होता. रॅलीमध्ये चौकाचौकात प्रताप सरनाईक यांचे पदाधिकारी, नागरिकांनी स्वागत करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रताप सरनाईकांनी २००९, २०१४ या विधानसभेच्या निवडणुकीत १४६ ओवळा माजिवडा मतदारसंघातून निवडून आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ८४,००३ मतांनी विजयी झाले होते. प्रताप सरनाईक विजयाच्या चौकरासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.

ठाणे, मिरा भाईंदर या महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या ओवळा माजिवडा मतदारसंघात गेल्या १५ वर्षांपासून विकासकामे करत आलोय. पुन्हा एकदा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून संधी मिळाली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. मायबाप जनतेची साथ आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत, अशा भावना प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech