गुजरातमध्ये 5 वर्षांपासून सुरू होते बोगस कोर्ट

0

तोतया न्यायाधीश मॉरिस सॅम्युअल करायचा निवाडा
गांधीनगर – गुजरातच्या एका ठगाने चक्‍क बनावट कोर्ट तयार करुन अनेक केसेसचा निकालही दिल्याचा भंडाफोड झाला. मॉरिस सॅम्‍युअल क्रिस्‍टीअन असे आरोपीचे नाव असून तो गांधीनगर येथील रहिवाशी आहे. यासंदर्भातील माहितीनुसार गेले साडेपाच वर्षे मॉरिस सॅम्युअल क्रिस्टीअन हे कोर्ट चालवत होता. तोतया न्यायाधीश असलेल्या मॉरिसने अनेक जमिनीसंदर्भातील प्रकरणात निवाडाही दिला आहे. आता स्‍थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हे बनावट न्यायालय बंद केले. तर कर्जन पोलिस ठाण्यात याबाबात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी मॉरिसला अटक केली आहे. मॉरिस क्रिस्‍टीअन हा पेशाने वकील आहे. क्रिस्‍टीअन याच्या विरोधात ठाकोर बाबूजी छन्नाजी यांनी तक्रार दिली. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्‍यांच्या एका प्रकरणात क्रिस्‍टिअन ने मध्यस्‍थी केली होती स्‍वतःला कोर्टामधील मध्यस्‍थ असल्‍याचे सांगत त्‍यांची फसवणूक केली. अनेक प्रकरणात सरकारी जमीन त्रयस्‍थ व्यक्‍तीच्या नावे करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांच्या माहितीनुसार तो आपल्‍या ऑफिसमध्ये फिर्यादींना बोलवून घेत असे व स्‍वतःला न्यायाधीशांचा मध्यस्‍थ म्‍हणवून घेत असे. अशा फिर्यादींकडून पैसे वसुल करुन बोगस न्याय देत असे. त्‍याने आपले ऑफिसही हुबेहुब कोर्टासारखे बनवून घेतले होते. आरोपीने 2019 मध्ये कोट्‌यवधी रुपयांची सरकारी जमीन आपल्‍या नावावर केली होती तसेच त्‍याने तसे बनावट आदेशही जिल्‍हाधिकारी कार्यालयातही दिले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech