मुंबई – ज्युपिटर हॉस्पिटलच्या निलेश शिंदे यांना यंदाचा अस्पायरींग सीएक्सओ अवॉर्ड जाहीर. हेल्थकेअर इनोवेशन संदर्भात हा पुरस्कार देण्यात आला आहे. निलेश शिंदे हे जूपिटर हॉस्पिटल्स येथे ग्रुप चीफ टेक्निकल ऑफिसर आणि प्रोजेक्ट हेड म्हणून सध्या कार्यरत आहेत. आरोग्य विभागातील कार्यासाठी निलेश यांना हा विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. सीएक्सओ जंक्शन तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. मुंबईतील सहारा हॉटेल इथे हा पुरस्कार सोहळा आज पार पडला.