ठाणे पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स प्रमुख पदी शेखर बागडे

0

(टीम ठाणेकर)
ठाणे – ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस आयुक्तालयात स्पेशल टास्क फोर्स निर्माण केला असून त्याच्या प्रमुख पदी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांची नियुक्ती केली आहे.
पोलीस खात्यामध्ये स्पेशल टास्क फोर्स ही संकल्पना सर्वप्रथम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. या टास्क फोर्स चे प्रमुख उद्दिष्ट संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या मुस्क्या आवळणे आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून मोठे गुन्हे घडण्याआधीच ते उघडकीस आणून संभाव्य गुन्ह्यांना प्रतिबंध करणे हे आहे. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळेच या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखणे याकडे गृह खाते अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देत आहे. कोणत्याही अनुचित घटना गुन्हेगारी कारवाया तसेच संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी ठाणे जिल्ह्यात डोके वर काढू नये यासाठीच ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची गुन्हे शाखेत सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नती झाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी बागडे यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात स्पेशल टास्क फोर्स निर्माण करून या टास्क फोर्स ची जबाबदारी सहाय्य पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech