(गोपाळ पवार)
मुरबाड – मुरबाड – मुरबाड राखीव जंगलात, अभयारण्यात मानवाकडून अतिक्रमण होऊ लागल्याने आणि मोठ्या प्रमाणावर जंगलतोड वाढल्याने जंगलातील प्राणी पक्षी नजीकच्या गाव वस्तीत आता निवारा शोधू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत जंगलात आगी लावण्याच्या घटना वाढल्या. नदी नाले आटले, पाण्याचा टिपूस जंगलात राहिला नाही. ज्या वनविभागाची जबाबदारी आहे त्या कडून कृत्रिम पाणवठे करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. उलट जंगलतोडीला अभय लाभले आहे.त्यातच नैसर्गिक आपत्तीचं ग्रहण कायम असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या व अन्नाच्या शोधात गावाकडे धाव घेऊ लागले आहेत, विणीच्या हंगामात सुरक्षीततेच्या दृष्टीने एखाद्या लाईटच्या पोलवर काट्याकुट्याचं घरट करीत प्रपंच स्थापतानाचे अस दृष्य पाहता निसर्गावर केवळ शेती व शेतकरी नाही तर संपुर्ण मनुष्य जिवन आणि भोवताल चे पर्यावरण अवलंबून आहे. जंगल,वन्य पशुपक्षी, हि एक निसर्गाची साखळी आहे. यातील काही ‘कड्या’ निखळण्यास आपणच कारणी भूत ठरत आहोत. मानवासह सर्वत्र “जिवो जिवस्य जिवनम्” हि अन्नसाखळी पुर्णत कोळमडते. त्यांचा परिणाम भविष्यात शेतकऱ्यानं बरोबरच मानव जातीला भोगायला लागतील अशी भीती पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.
हवामानाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे नैसर्गिक आपत्ती तर होत राहणार आहेत. अन्नसाखळी कोलमडली आहे व हे भविष्यात फार घातक आहे. गिधाडं नामशेष झाली, म़धमाश्याच्याचे पोळे दिसेनासे झाल्याने फळांचे परागीकरण थांबले, वटवाघुळा मुळे वड पिंपळाच्या़ फळाचे(त्यांच्या विष्टेतुन)मिळणारे नेसर्गिक खत मिळणे बंद झाले. एक प्रकारे हळूहळू हि अन्नसा़खळी निखळून एक दिवस शेतकरी हा शेवटचा दुवा ठरू नये म्हणून पक्ष्यांना आता झाडांऐवजी लाईटच्या खांबांवर घरटे उभारावे लागत आहे.लाईटच्या पोलवर कट्याकुट्याचा संसार थाटणा-या या दोन जिवाकडूव काहीतरी शिकलं तर टिकून राहता येईल अन्यथा जगाचा पोशिंदा गावसोडून शहराकडे धाव घेतोय तर जंगल नष्ट झाल्याने जंगलातील वन्य जिव गावाकडे मानवी वस्तीकडे झेपावल्याचे चित्र समोर येत आहे.