परभणी – महाराष्ट्रात पूर्व व पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर तसेच मध्य व पश्चिम महाराष्ट्र, आणि कोकणपट्टीत काही ठिकाणी येत्या २९, ३०, ३१ मार्च तसेच ६, ७, ८ एप्रिल रोजी अवकाळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. पाऊस विखुरलेला तुरळक असेल, तो सर्वदूर नसेल त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असा दिलासाही त्यांनी दिला आहे.
राज्यात कांदा, गहू, हरभरा तसेच द्राक्ष आदी पिके कापणीस आली असल्याने ५ एप्रिलपूर्वी शेतकऱ्यांना आवश्यक काळजी घेण्यास, विशेषत: कांदा झाकण्यास सांगण्यात आले आहे.