शरदचंद्र पवार गटाकडून कल्याण पूर्व विधानसभेसाठी सुधीर वंडारशेठ पाटील रिंगणात ?

0

कल्याण – लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांचे नाव शिवसेना ठाकरे गटाकडून आघाडीवर होते ते ठाकरे गटात जातील अशी चर्चाही होती. मात्र ते राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटासोबत राहिले. त्यामुळे शरदचंद्र पवार गटाकडून कल्याण पूर्व विधानसभेसाठी सुधीर वंडारशेठ पाटील रिंगणात? अशी सक्रिय झाली चर्चा रंगली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. सुधीर पाटील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाच वेळा सभापती राहिलेले डॉ. वंडारशेठ पाटील यांचे चिरंजीव आहेत. डॉ. वंडारशेठ पाटील यांची कल्याण डोंबिवली मध्ये मोठी ताकद आहे. तसेच त्यांची कल्याण डोंबिवलीमध्ये जनसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा आहे. याशिवाय वंडारशेठ यांचे सर्व पक्षीय नेत्यांचे स्थानिक पातळीवर चांगले संबंध आहेत. पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे सुधीर पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर ठाकरे गट व काँग्रेस पक्षाचा आपोआप फायदा १४२ कल्याण पूर्व विधानसभेतून मिळू शकतो.

सुधीर पाटील कोण आहेत ? :  सुधीर पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. तसेच सरपंच, पंचायत समिती सदस्य अशा अनेक पदांचा पदभार त्यांनी उत्कृष्ट्या सांभाळला आहे. त्यांचे एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून पुढे अजून एलएलएमचे शिक्षण घेत आहेत. एक सुशिक्षित, सुसंस्कृत, युवा, कार्यक्षम, आगरी स्थानिक मराठी चेहरा जनसामान्यांची जाण असणारा उमेदवार म्हणून सुधीर पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. सुधीर पाटील यांच्या नावाला कल्याण पूर्व मतदारसंघात प्रचंड लोकांची पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे कल्याण पूर्व विधानसभेची निवडणूक ही अतिशय लक्ष वेधणारी असणार आहे. तसेच लोकसभेचा निकाल पाहता जनसामान्यांना विधानसभेत ही महाविकास आघाडी सत्ता येणार अशी चर्चा आहे व सुधीर पाटील हे कल्याण पूर्व विधानसभेतून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी चर्चा आहे.

कल्याण पूर्वे १४२ विधानसभेचा इतिहास काय ? :  सध्या तरी कल्याण पूर्व मतदार संघात महायुतीमध्ये आपसी मतभेद दिसून येत आहेत. तसेच त्यांच्यात आता तरी दुफळी निर्माण झाल्याची नागरिकांमध्ये दिसून येत आहे. भाजप सेनेचा आपसी वाद पाहता व महाराष्ट्रात महाविकास आघाडीची वाढती ताकद पाहता लोकांचे मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचा कल दिसून येत आहे व विजय हा महाविकास आघाडीचाच निश्चित आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech