तलाव आणि घाट सुशोभीकरणासाठी २० कोटी

0

– खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश

– प्रादेशिक पर्यटन विभागाच्या माध्यमातून निधीची मंजुरी

कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण तालुक्यातील विविध तलावांच्या आणि डोंबिवली पश्चिमेतील गणेश घाट सुशोभीकरणासाठी राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विभागाच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यशासनाकडून ५ ऑक्टोबर २०२४ रोजी याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याअंतर्गत कांबा तलाव, भाल गाव तलाव, माणगाव तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहर सुशोभीकरण, शहरांतगर्त वाहतूक नियमित व्हावी यासाठी मुख्य रस्त्यांची उभारणी आणि जोडणी, विविध उड्डाणपुलांची उभारणी, अभ्यासिका, ग्रंथालय या विकासकामांची उभारणी करण्यात आली आहे. मतदारसंघातील शहरी भागातील विकासकामांबरोबरच ग्रामीण भागातील विकासकामे देखील पूर्ण करण्यावर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कायमच भर दिला आहे. शहरात विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीसह शहर सुशोभीकरणासाठी देखील खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागली आहेत.

शहरात विविध ठिकाणी बगीचे, उद्याने यांची उभारणी करणे तसेच अनेक उद्यानांचा कायापालट करणे, शहरातील तलावांचे सुशोभीकरण करणे यांसारखी विविध कामे कल्याण लोकसभा मतदारसंघात मार्गी लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील विविध तलावांचे सुशोभीकरण करण्यासाठी १५ कोटींचा तर डोंबिवली पश्चिमेतील गणेश घाट सुशोभीकरणासाठी ५ कोटी असा एकूण २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तलावातील गाळ साफ करणे, तलाव परिसरात भेट देणाऱ्या नागरिकांसाठी आसनव्यवस्था, लहान बगीचे यांसह विविध पायाभूत सुविधांची उभारणी कांबा तलाव, भाल गाव तलाव, माणगाव तलाव या ठिकाणी करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालविण्यासाठी एक हक्काचे ठिकाण तर उपलब्ध तर होणारच आहे. मात्र यासह नैसर्गिक तलावांचे संवर्धन देखील होणार आहे.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech