मुंबई – शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली असे सांगितले जात असले तरी त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले. त्यामुळे उद्या आपण या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी ठरवले आहे. या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते.