मत्स्य महाविद्यालयातील मत्स्यखाद्य निर्मिती तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रतिसाद

0

रत्नागिरी – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या येथील मत्स्य महाविद्यालयात झालेल्या मत्स्य खाद्य निर्मिती तंत्रज्ञान आणि खाद्य व्यवस्थापन या विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे अध्यक्षस्थान मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधाकर इंदुलकर यांनी भूषवले. मत्स्यसंवर्धनामध्ये एकूण खर्चाच्या ६० ते ७० टक्के खर्च मत्स्यखाद्यावर होतो. योग्य दर्जाचे घटक निवडून, आधुनिक मत्स्य खाद्य निर्मिती तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास निश्चितपणे हा खर्च कमी करता येतो. मत्स्य शेतकऱ्यांना शेती करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आल्यास या प्रशिक्षण कार्यक्रमानंतरदेखील मार्गदर्शनासाठी मत्स्य महाविद्यालय सदैव खुले आहे, याची ग्वाही डॉ. इंदुलकर यांनी दिली. पेण येथील आत्माचे संचालक नचिकेत जगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमात मत्स्यखाद्य निर्मिती तंत्रज्ञान आणि खाद्य व्यवस्थापन या घडीपत्रिकेचे प्रकाशन झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. बी. आर. चव्हाणयांनी काम पाहिले. या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसार व प्रचार केल्यास शेतकऱ्यांच्या मत्स्य उत्पादनात वाढ होऊ शकते, असे प्रास्ताविकात डॉ. चव्हाण यांनी सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रक्षेत्र भेटीसाठी प्रशिक्षणार्थींना आधुनिक यंत्राद्वारे मत्स्य खाद्य निर्मिती बनवण्याचे तंत्रज्ञान मिळविण्यासाठी मत्स्यकुटी निर्मिती करणारी टी. जे. मरीन, तसेच प्रो इंडो अक्वा फिशफीड, बोरपाडले, जि. कोल्हापूर येथे नेण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech