ठाण्यात निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढत होणार… राजन विचारे ..

0

(टीम ठाणेकर)
ठाणे – हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब व आदित्य ठाकरे साहेब यांनी तिसऱ्यांदा मला खासदार म्हणून संधी दिली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो अशा शब्दात ठाण्याचे महा आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यावर आपली कृतज्ञता व्यक्त केली.
विचारे यांनी यावेळी असे म्हटल आहे की पहिली सत्ता ज्या ठाण्याने शिवसेनेला दिली. आणि या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल जी विकासाची काम ठाण्यामध्ये झाली त्याच जोरावर ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक यासाठी प्रतिष्ठेची आहे की ज्या ठाण्यामधून पहिली गद्दारी झाली होती तीच गद्दारी आता दुसऱ्यांदा झाली. गद्दार विरुद्ध निष्ठावंत हा असा सामना होणार आहे. आणि निश्चितच जनता योग्य तो न्याय देईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech