ठाणे – ठाणे महानगरपालिकेला मे.स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक 27/09/2024 रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून ते शनिवार दिनांक 28/09/2024 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल दुरूस्ती करणे व पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी 1530 मि.मी व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबविण्याची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या पिसे व टेमघर शुध्दीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन, पंपिग मशिनरीची तातडीची निगा, देखभाल, दुरूस्ती व इतर तातडीचे कामे करण्यासाठी महापालिका स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा 24 तासाचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे.
परिणामी शुक्रवार दि. 27/09/2024 रोजी सकाळी 9.00 ते शनिवार सकाळी 9.00 वाजेपर्यत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. सदर कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.