मनोरंजनाची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात

0

Fun Panipuri in theaters soon

मुंबई – झणझणीत, तिखट, कुरकुरीत, आंबट-गोड पदार्थ म्हटलं की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि मनालाही ते खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.

प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट असते.. कधी खूप आनंद, प्रेम, विश्वास देणारी तर कधी सोबत दुःख घेऊन येणारी..अशाच लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट घेऊन ‘पाणीपुरी’ हा चित्रपट आपलं मनोरंजन करणार आहे. मकरंद देशपांडे, सायली संजीव, ऋषिकेश जोशी, विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर, अभय गिते आदि कलाकार मंडळी आपल्या मनोरंजनातून ‘पाणीपुरी’ची चव आपल्याला चाखायला देणार आहेत. चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत. मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech