ठाणे – वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे नवरात्रोत्सवाला सुरूवात केली. दिघे साहेबांची हीच परंपरा जपत दरवर्षी याठिकाणी मोठ्या श्रद्धेने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही जय अंबे माता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या माता दुर्गेश्वरी देवीचा मंडप पूजन सोहळा आज दुर्गेश्वरी मातेच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते विधिवत मंडपपूजन करण्यात आले.
याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटीका सौ.मिनाक्षीताई शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.