मुंबईत जिओ नेटवर्क बंद, नेटीझन्सकडून अंबानींना ट्रोल

0

मुंबई – गणपती विसर्जनाच्या जल्लोषात मुंबईत जिओचं नेटवर्क अचानक गायब झालं, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त झाला. गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडत असतानाच जिओचं नेटवर्क बंद झालं, त्यामुळे नेटीझन्सनी ट्विटरसह विविध माध्यमांवर स्क्रीनशॉट शेअर करत रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना ट्रोल केलं. मुंबईत जिओ नेटवर्क तब्बल पाऊणतास बंद राहिलं, ज्यामुळे फोन कॉल्स आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे हजारो ग्राहकांना तांत्रिक अडथळ्यांचा सामना करावा लागला. अनेकांनी ट्विटरवर जिओच्या सेवा बंद असल्याचं नमूद करत १० हजाराहून अधिक तक्रारी नोंदवल्या. डाऊन डिटेक्टर वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, जिओचं नेटवर्क सकाळी ११:१५ वाजल्यापासून दुपारी १२:३० वाजेपर्यंत बंद होतं. या कालावधीत मुंबईतील अनेकांनी एअरटेलसारख्या इतर सेवा सुरू असल्याचं सांगितलं, मात्र जिओच्या नेटवर्कमध्ये अडचणी असल्याचे स्पष्ट झाले. नेटीझन्सच्या संतापामुळे सोशल मीडियावर अंबानींना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech