वर्षा निवासस्थानी एस.टी.चालक वाहकांकडून बाप्पाची मनोभावे आरती 

0

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक वाहक आणि इतर शेकडो कर्मचाऱ्यांनी आज वर्षा निवासस्थानी येऊन विराजमान झालेल्या श्री. गणेशाची मनोभावे आरती केली. यावेळी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वांसोबत संवाद साधत या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आजपर्यंतच्या इतिहासात एस.टी. कर्मचाऱ्यांना कोणत्याही मुख्यमंत्र्याने वर्षा बंगल्यावरती गणपतीच्या आरतीचा मान दिला नव्हता. त्याचप्रमाणे यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना (एस.टी.)भरघोस पगारवाढ देखील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी (एस.टी.) मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानले आणि गणपती बाप्पा कडे साकडे घातले की मा.एकनाथजी शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री आम्हाला कायमस्वरूपी लाभोत. याप्रसंगी शिवसेना सचिव/प्रवक्ते, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.किरण पावसकर साहेब उपस्थित होते.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech