पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत ऑगस्टमध्ये २० टक्क्यांनी वाढ

0

पुणे – पुणे मेट्रोचे तिकीट घेण्यासाठी ७० टक्के प्रवासी डिजीटल पद्धतीचा अवलंब करत आहेत तर, रोख रक्कम घेऊन तिकीट काढणाऱ्यांची संख्या केवळ ३० टक्के आहे. डिजिटल माध्यमातून तिकीट घेणाऱ्यांमध्ये पुणे मेट्रो देशात अग्रेसर आहे. दरम्यान, पुणे मेट्रोचे ऑगस्टमध्ये प्रवासी २० टक्क्यांनी वाढले आहेत. डिजिटल पद्धतीने तिकीट घेतल्यामुळे कागदाची बचत होऊन पुणे मेट्रोच्या पर्यावरण पूरक उद्दिष्टांना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. मेट्रो स्थानकांवरील डिजिटल किऑस्कद्वारे २० टक्के, तिकीट वेंडिंग मशीनद्वारे ६ टक्के, व्हॉटसअपच्या माध्यमातून १८.८ टक्के, मोबाईल अॅप द्वारे ९.१७ टक्के आणि महामेट्रो कार्डद्वारे १३ टक्के लोकांनी मेट्रोचे तिकीट घेतले आहे.

पुणे मेट्रोचा रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मार्ग सुरू झाल्यावर दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये वाढ होत असून ऑगस्टमध्ये दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या १ लाख १८ हजार २४१ झाली आहे. त्यातून मेट्रोला ५ कोटी ६९ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर, दैनंदिन सरासरी उत्पन्न १८ लाख ६८ हजार झाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय या मार्गावर २९ टक्के प्रवासी संख्या तर रामवाडी ते वनाज या मार्गावर ७१ टक्के प्रवासी संख्या आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech