ठाण्यात सायकल राईडमधून दिला मतदानाचा संदेश

0

ठाणे, २६ मार्च : ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावावा हा संदेश देण्यासाठी सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते या राईडमध्ये १६० सायकलप्रेमींनी सहभाग घेतला.

सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतर्फे मतदारांमध्ये जागृतीसाठी अभियान सुरू आहे. या अभियानातंर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी, मतदान याच्याबद्दल जागरुकता निर्माण केली जात आहे.

याच अभियानाचा एक भाग म्हणून दोन टप्प्यात ही सायकल राईड संपन्न झाली. नितीन जंक्शन ते निर्बंध रोड आणि ठाणे पूर्व पवई ते मीठ बंदर रोड असे या राईडचे मार्ग होते.

Voting message given through bicycle ride in Thane

”एकेका मताने बनते पडते सरकार” म्हणून तुमचे मत करू नका बेकार”, संपूर्ण जगात आहे भारतीय लोकशाहीचे नाव, मतदान करून जागृतपणे दाखवा त्याची शान”, ”मतदान का हक हे हर नागरिक का हक,जो इसे बजायेगा सच्चा नागरिक कहलायेगा”, ”मतदान करा, परिवर्तन घडवा”, ”युवर व्होट इज युअर व्हॉइस”अशा संदेशासह या वेळेला सायकल प्रेमींनी राईड मध्ये सहभाग घेतला.

कोपरी येथील मीठबंदर रोड अंफिथिएटर येथे या सायकल राईडची सांगता झाली. विश्वविक्रमी सायकलपटू सतीश जाधव यांनी मतदानाची माहिती दिली.

लोकल राईडचे नेतृत्व संकेत सोमणे, चंद्रशेखर जगताप, अजय भोसले, गुरुप्रसाद देसाई, विनोद फर्डे, पंकज कुंभार यांनी तर लॉंग राईडचे नेतृत्व पंकज रिजवानी, अमोल कुलकर्णी, योगेश नाखवा, महेश राऊत,महेश सोमवंशी आणि आदेश जाधव यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech