सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची तडकफडकी बदली…..!

0

मुंबई – सिंधुदूर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्याच आठवड्यात कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना राज्य सरकारने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी तातडीने तावडे यांच्या जागी हाफकिन बायो फार्मा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने आज तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.या आदेशात किशोर तावडे यांचाही समावेश असून तावडे यांची बदली महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली आहे.तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या एस.जी.कोलते यांची नियुक्ती भंडारा जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech