मुंबई, २५ मार्च : धुळवडीनंतर माहिम समुद्रकिनारी फिरायला आलेली पाच मुलं बुडाल्याची घटना सोमवारी घडली. यातील चौघांना वाचवण्यात यश आले आहे. त्यातील दोघे सुखरुप असून अन्य दोघांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यश कागडा हा तरुण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. हर्ष किंजले असे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
कॉलेजात शिकणारे हे सर्व तरुण समुद्रकिनारी फिरायला गेले होते. त्यानंतर हा प्रकार घडलाय. रात्री उशिरापर्यंत माहीम पोलीस, अग्निशामक दलाचे पथक, सागरी पोलीस आणि स्वयंसेवक उपस्थित आहेत.