जानकर परभणीतून लढणार!

0

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेतेमहादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यानी सविस्तर चर्चा केली. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका करणारे, भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना लक्ष्य करून महाविकास आघाडीशी बोलणी करत असलेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अचानक पलटी मारली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीतच राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून महायुतीने रासपला एक लोकसभेची जागा देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. धनगर समाज विरोधात जाऊ नये, यासाठी महायुतीने जानकरांना आपल्याकडेच ठेवून महाविकास आघाडीला मोठा शह दिला आहे. महादेव जानकर परभणी लोकसभेतून लढतील, अशी दाट शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असेही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech