अमरावती : प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच राहण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी अमरावतीमध्ये स्वतंत्र लढणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. आमचा वारंवार अपमानीत केलेल्या नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.
बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे की, राणांनी आम्हांला वारंवार अपमानीत केलं, त्यामुळे कार्यकर्त्यांनी शरणागती पत्करण्याची मानसिकता नाही. आघाडीची उमेदवारी मागा पण, राणांचा प्रचार करायचा नाही, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. सातत्याने कार्यकर्त्यांनी ही भूमिका मांडली असून पक्ष सोडण्याची भावनाही व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय. चांगल्या उमेदवाराच्या आम्ही शोधात होतो. आम्हांला भाजपमधीलच चांगला उमेदवार सापडला आहे.