नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला अनुकूल भूमिका घेणारी आणि काँग्रेसवर सातत्याने टीका करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने कंगनाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. विविध राज्यांत मिळून एकूण १११ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने श्रीरामाची भूमिका साकारणारे अरूण गोयल यांना उत्तर प्रदेशच्या मेरठमधून तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचलच्या मंडीमधून संधी देण्यात आली आहे.