सर्वोच्च न्यायालयाकडून हिजाब बंदीला स्थगिती

0

मुंबई –  मुंबईतील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीचे एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयाने हिजाब, नकाब, बुरखा, टोपी परिधान करण्यास बंदी घातली आहे. या बंदीच्या विरोधात महाविद्यालयाच्या निर्णयाविरुद्ध ९ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, उच्च न्यायालयाने २६ जून २०२४ रोजी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर विद्यार्थिनींनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या घटनेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालय प्रशासनाला नोटीस बजावून उत्तरासह हिजाब बंदीला स्थगिती दिली. यावेळी न्यायालयात महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वतीने वकिल म्हणून अल्ताफ खान यांनी युक्तिवाद केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech