घोडबंदरसाठी भातसा धरणातून २० एमएलडी पाण्याची तरतुद

0

ठाणे – ठाण्यातील घोडबंदर भागामध्ये वाढती बांधकामे आणि लोकसंख्या यामुळे येथील गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून विविध स्त्रोतांतून अतिरिक्त पाणी पुरवठा या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून भातसा धरणातून २० एमएलडी पाण्याची तरतुद करावी. हा लवकरच हा परिसर टँकरमुक्त होईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.घोडबंदर वासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणुन भातसा धरणातून २० एमएलडी पाण्याची तरतुद करावी. अशी सुचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेला केली. यावर प्रशासनाने सहमती दर्शविली असल्याची माहिती केळकर यांनी दिली. सुर्या धरणाचे पाणी मीरा-भाईंदर महापालिकेला मिळत आहे, त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेलाही पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केळकर यांनी सांगितले.

माजीवाड्यापासून उर्वरित घोडबंदर पट्ट्यात पाण्याच्या टाक्या आहेत, पण पुरेसा पाणी पुरवठा नसल्याने स्थानिक रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. अमृत योजनेमधून पाण्याचे समतोल वितरण व्हावे यासाठी आता जलकुंभ उभारण्यात येत आहे. त्यामुळे समान पाणी वाटप होऊ शकेल, असेही केळकर यांनी सांगितले. स्टेमकडून अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर परिसर लवकरच टँकरमुक्त होईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.

घोडबंदर परिसरातील पाणी टंचाईग्रस्त गृहसंकुलाचे अनेक प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजपा गटनेते कार्यालयात भेट घेतली. यावेळी ठामपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech