कोकण रेल्वेवर मुंबई-पुण्याहून रत्नागिरीसाठी पाच विशेष गणेशोत्सव गाड्या

0

रत्नागिरी – सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने रत्नागिरीपर्यंत धावणाऱ्या आणखी पाच विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.
नव्याने जाहीर झालेल्या गाड्यांचा तपशील असा – १) गाडी क्र. 01131 / 01132 लोकमान्य टिळक (टी) – रत्नागिरी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (द्विसाप्ताहिक) – गाडी क्र. 01131 लोकमान्य टिळक (टी) – रत्नागिरी विशेष शुक्रवार व शनिवार म्हणजेच ६, ९, १३ आणि १४ सप्टेंबरला रात्री ८ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (क्र. 01132) शनिवार व रविवारी म्हणजेच ७, ८, १४ आणि १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी रत्नागिरीतून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी सव्वापाच वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड़, चिपळूण, सावर्डे, आरवली आणि संगमेश्वर येथे थांबेल. गाडीला एकूण २१ डबे असतील. त्यात एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांचा समावेश आहे.

२) गाडी क्र. 01447 / 01448 पुणे – रत्नागिरी आणि परत. गाडी क्र. 01447 पुण्याहून शनिवारी, ७ आणि १४ सप्टेंबरला पहाटे १२ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११,५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01448 रविवारी, ८ आणि १५ सप्टेंबरला सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता पुण्याला पोहोचेल. गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड़, चिपळूण, सावर्डे, आरवली आणि संगमेश्वरला थांबेल. गाडीला एकूण २२ डबे असतील.

३) गाडी क्र. 01444 / 01443 रत्नागिरी – पनवेल आणि परत. गाडी क्र. 01444 शनिवारी, ७ आणि १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरीतून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे १.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01443 क्रमांकाची पनवेल – रत्नागिरी गाडी रविवारी, ८ आणि १५ सप्टेंबरला पहाटे ४.४० वाजता पनवेल येथून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. ही गाडी संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड़, करंजाडी, वीर, माणगाव, रोहा आणि पेण येथे थांबेल. या गाडीला २२ डबे असतील.

४) गाडी क्र. 01445 / 01446 पुणे – रत्नागिरी आणि परत. गाडी क्र. 01445 मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी पहाटे १२.२५ वाजता पुण्यातून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरिता गाडी क्र. 01446 रत्नागिरीतून ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरीतून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता पुण्याला पोहोचेल. गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड़, चिपळूण, सावर्डे, आरवली आणि व संगमेश्वर येथे थांबेल. गाडीला २० डबे असतील.

५) गाडी क्र. 01442 / 01441 रत्नागिरी – पनवेल आणि परत. गाडी क्र. 01442 मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरीतून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे दीड वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासाला गाडी क्र. 01441 पनवेलहून बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. गाडी संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड़, करंजाडी, वीर, माणगाव, रोहा आणि पेण येथे थांबेल. गाडीला २० डबे असतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech