ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंतांना सर्जरीसाठी आर्थिक साहाय्य

0

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून मुख्यमंत्री निधीतून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द

मुंबई – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुचल्यातून उभारलेल्या शिवसेनेचा आवाज बुलंद आवाज मार्मिक साप्ताहिकाच्या जडणघडणीमध्ये अत्यंत मोलाचे योगदान असलेले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत हे दिवंगत बाळासाहेब यांचे निकटवर्तीय सहकारी राहिले आहेत. गेल्या काही काळापासून ते आजारी असल्याने त्यांच्यांवर पेस मेकरची बॅटरी सर्जरी करण्यात आली. मात्र, आता ती व्यवस्थित काम करत नसल्याने पुन्हा पेस मेकरची बॅटरी सर्जरी करण्याची डॉक्टरांनी सावंतांना सूचना केली.

सर्जरीसाठी मोठा खर्च अपेक्षित असतांना आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेसाठी सावंतांनी दिलेले योगदान लक्षात घेता तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री निधीतून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना केला सुपूर्द करून डॉ. गोऱ्हे यांनी वैद्यकिय मदत पोहोच केली. यावेळी पंढरीनाथ सावंत यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सरकार त्यांच्या सोबत आहे, अशी ग्वाही दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech