कुमार गटात रणिल कबड्डी संघ तर पुरुष गटात अमर ज्योत संघ विजयी
मुंबई – शिवजन्मोत्सव सोहळा समिती आणि गौरी शंकर क्रीडा मंडळ, कुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने कुर्ला पश्चिम येथील गांधी मैदानावर आयोजित कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात अमर ज्योत संघ तर कुमार गटात रणिल कबड्डी संघ घाटकोपर विजेता संघ ठरला.
कबड्डी स्पर्धेची सुरुवात गांधी मैदान अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नेतृत्व करणारे ९२ वर्षीय दि.मा.(अण्णा) प्रभुदेसाई यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन व दीपप्रज्वलनाने झाली. मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर, उत्सव समितीचे दिलीप सराटे मास्तर, उमेश गायकवाड, गणेश चिकने, विनायक गाढवे, विवेक चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत, इकबाल शिकलगार, संजय यादव, केशव शिंदे, शशिकांत लोखंडे, सत्यवान गवळी, चेतन कोरगांवकर, धनंजय दळवी, मंगला नायकवडी, डिंपल छेडा सहित गौरीशंकर क्रीडा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विश्वास कांबळे, अध्यक्ष अमित कांबळे, रामचंद्र माने, प्रसाद भांडारकर, संजय घोलप, संजय घोणे, कैलास पाटील, अरविंद दाभाडे, चैतन्य जाधव, रुपेश प्रभाळे, निलेश घोलप व कार्यकर्ते उपस्थित होते.
ह्या स्पर्धेत कुमार गट व प्रथमश्रेणी पुरुष गट असे एकुण १६ संघांनी भाग घेतला होता. कुमार गटात अंतिम सामना जयशंकर चौक कुर्ला व रणिल कब्बडी संघ (घाटकोपर) यांच्यात झाला व त्यात रणिल कब्बडी संघ घाटकोपर विजेता संघ ठरला. त्यांनी आपले नाव शिवछत्रपती करंडकावर कोरले. त्याच बरोबर रोख रुपये ५०००/- चे पारितोषिक पटकावले. तर कुमार गटात उपविजेता संघ जय शंकर चौक कुर्ला यांना रोख रुपये ४०००/- व सुबक चषक मिळाले. तसेच प्रथमश्रेणी पुरुष गटात अंतिम अमर ज्योत घाटकोपर आणि शितलादेवी कबड्डी संघ चेंबूर यांच्यात रंगला. या चुरशीच्या अंतिम सामन्यात अमर ज्योत कबड्डी संघाने विजेता म्हणून आपले नाव शिवछत्रपती करंडकावर आपले नाव कोरले व रोख रक्कम रुपये ८०००/- चे पारितोषिक पटकावले. तर उपविजेता ठरलेला संघ शितलादेवी कब्बडी संघाने उपविजेता चषकासहीत रोख रक्कम ६०००/- चे मानकरी ठरले. विजेता व उपविजेता संघाना प्रो कबड्डी स्पर्धेचे खेळाडु अजिंक्य खापरे यांच्या विशेष उपस्थितीत चषक व पारितोषिक देण्यात आला. या स्पर्धा यशस्वीपणे व सुरळीत करण्यासाठी प्रतिक गाढवे, विकास कांबळे, निलेश झंजे, अतुल चव्हाण, मुनाफ शेख यांनी मेहनत घेतली.