मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियाचे अभिनंदन

0

कांबळवाडीतील कुटुंबियांशी साधला दुरध्वनीवरून संपर्क

मुंबई – नेमबाज स्वप्नील कुसाळे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना सांगितले. पॅरीस ऑलिंपिक २०१४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नीलच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिनंदन केले.

दुरध्वनी संभाषणात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कांबळवाडीतील कुसाळे कुटुंबियांचे अभिनंदन केले. कुसाळे कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळेच स्वप्नील या यशापर्यंत पोहचू शकला आहे. त्याच्या गेल्या १२ वर्षांच्या मेहनतीमुळे देशाला आणि राज्याला क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण असे यश मिळाले आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, स्वप्नीलला शालेय जीवनापासून ते नेमबाजीत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गुरुजन, प्रशिक्षक, मार्गदर्शक अशा सर्वांचे योगदान निश्चितच महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांची आठवण झाली. स्वप्नीलच्या या कामागिरीने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उत्साह, आनंदाचे उत्साह निर्माण झाले आहे. कांबळवाडी ते पॅरीसमध्येली ऑलिंपिक पदाला गवसणी हा स्वप्नीलचा प्रवास क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या होतकरू खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech