मुंबई – दहावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान भाग १ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा’ या प्रश्नाचे ‘हेलियम’ किंवा ‘हायड्रोजन’ असे उत्तर मुलांनी लिहिले असल्यास या दोन्ही उत्तरांना गुण देण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
दहावी विज्ञान भाग १ पाठ्यपुस्तकानुसार या प्रश्नाचे अचूक उत्तर ‘हेलियम’ असे आहे. तर काही संदर्भ पुस्तकांमध्ये याचे उत्तर ‘हायड्रोजन’ असे आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्याच्या अनुषंगाने दोन्ही उत्तरांना गुण देणे सयुक्तिक होईल असे पत्र आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर व राज्य शिक्षण मंडळाला लिहिले होते.