ठाणे – ८ तलाव गाळमुक्त; २२ हजार ०५० क्युबिक मीटर गाळ काढण्यात यश

0

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना’ राबविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत मागील वर्षापासून करण्यात येत आहे. सन २०२४ व २०२५ या वर्षात मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी व कल्याण या पाच तालुक्यात पाझर तलाव व गाव तलावाचे एकूण ५० तलाव गाळमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जून २०२४ पुर्वी जिल्ह्यातील एकूण ८ तलावातील गाळ २२ हजार ०५० क्युबिक मीटर गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या ८ तलावातील पाणीसाठा दोन कोटी २० लाख ५० हजार लिटरने वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ४२ गाव तलाव व पाझर तलावांची काम मार्च २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली.

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मुरबाड तालुक्यातील ५, कल्याण तालुक्यातील २, शहापूर तालुक्यातील १ अशी एकूण ८ काय जून २०२४ पुर्वी पूर्ण करण्यात आली आहेत.

मागील वर्षी जून २०२३ पूर्वी १६ कामे पूर्ण करण्यात आली असून ३६ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे या तलावांमध्ये ३ कोटी ६० लाख लिटर पाणीसाठा वाढला आहे- दिलीप जोकार, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद ठाणे

ग्रामीण भागातील पाच तालुक्यात ६५ सिंचन व पाझर तलाव आहेत. लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडील आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तलावाचे प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता १८ हजार ४०७ स.घ.मी. असून सद्यस्थिती उपलब्ध पाणीसाठा १६ हजार ४८० स.घ.मी. आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech