ठाणे – “केंद्र सरकारने अर्थसंकल्प केला सादर… महाराष्ट्राच्या हातात दिले गाजर”, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाण्यात “गाजर” आंदोलन केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेशावर खैरात केली असली तरी महाराष्ट्राला फारसे काही दिलेले नाही. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाने आज शहराध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याकडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतले होते. “अर्थसंकल्पात एकच दोष… महाराष्ट्र रोष” असा संदेश असलेले बॅनर्स आणि फलक झळकवत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की, केंद्र सरकार हे महाराष्ट्राचा द्वेष करणारे सरकार आहे. आधी महाराष्ट्रातील उद्योग पळविले अन् आता अर्थसंकल्पात तोंडाला पाने पुसली आहेत. वास्तविक पाहता, महायुतीच्या खासदारांनी महाराष्ट्रासाठी संघर्ष करायला हवा होता. मात्र, हे खासदार गप्प बसले आहेत. जर आंध्र आणि बिहारवर खैरात केली जात असेल तर महाराष्ट्रावरील अन्यायाबाबत जाब विचारण्याची धमक भाजप , शिंदेगट आणि अजित पवार गटाने दाखवायला हवी होती. पण, ते तसे करू शकत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुर्देवं आहे, अशी टीका केली.
या आंदोलनात महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, युवती निरीक्षक प्रियांका सोनार, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, हाॅकर्स सेलचे सचिन पंधेरे, असंघटीत कामगार सेलचे राजू चापले, आसद चाऊस, महारष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रचना ताई वैद्य,दिपक क्षत्रिय, मिलिंद भाऊ बनकर, राजेश कदम, राजेश ज. साटम, ठाणे विधान सभा अध्यक्ष महेंद्र पवार, संदिप पवार, रवींद्र शिंदे, संजीव दत्ता, शुभम व्दिदवी, धर्मेंद्र अस्थाना, शिवा यादव, कुळविंदर सिंग सोखी, आशिष उमासरे, माधुरी सोनार, अरविंद मोरे, पटेल भाभी, ज्योती निंबाळकर, दिपक क्षत्रिय, शुभांगी खेडकर, शशी पुजारी, आरती गायकवाड, राणी देसाई, नितीन आहेर, हिरु गंगावणे, मनिषा म्हात्रे, साहिल उदुगाडे, वैभव खोत,पुरषोत्तम पाटील ,कैलास सुरकर, राहु पाटील, विलास पाटील, शेखर भालेराव, रिंकू सिंह, समीर नेटके, आशिष खाडे, राजेश मिश्रा आदी सहभागी झाले होते.