अमरावतीत भाजपचाच उमेदवार; राणा, अडसूळांचं काय? तिढा कायम

0

मुंबई : अमरावती लोकसभा निवडणुकीच्या २० जागांसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवार जाहीर केले. भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर करुन आठवडा उलटला आहे. पण अद्याप तरी उर्वरित २८ जागांचा प्रश्न कायम आहे. महायुतीत अद्यापही काही जागांवरु तिढा कायम आहे. त्यामुळे जागावाटप जाहीर झालेलं नाही. या सगळ्या पेचावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. महायुतीत कोणताही तिढा नाही. अवघ्या पाच मिनिटांत प्रश्न सुटतील अशी परिस्थिती आहे.
नवनीत राणा यांनी मागील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढवली. त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. मात्र राज्यात ठाकरे सरकार आल्यावर राणा आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा भाजपच्या जवळ गेल्या. हनुमान चालिसा प्रकरणावरुन त्यांनी भाजपशी जवळीक साधली. ठाकरेंना आव्हान देत त्यांनी महाविकास आघाडी सरकारसोबत पंगा घेतला. त्यांना अटकही झाली.
विद्यमान खासदार असल्यानं आताही आपल्यालाच तिकीट मिळावं अशी राणांची भूमिका आहे. तर याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार अडसूळही उत्सुक आहेत. त्यामुळे अमरावतीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. लक्ष्मीच्या हातात कमळ असतंच, असं म्हणत नवनीत राणा यांनी भाजप प्रवेशाचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले. राणा जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech