पत्रकारांच्या मौलिक सहकार्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन – डॉ. नीलम गोर्‍हे

0

मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टीव्हीजे असोसिएशनच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सत्कार महाराष्ट्र विधान परिषदेतील उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी विधानसभेच्या सभागृहात केला. निवडून आलेल्या सदस्यांना माझ्या शुभेच्छा. माझ्या या वाटचालीत आपणा सर्व पत्रकारांचे योगदान फार मोलाचे आहे. आपल्या मौलिक सहकार्याबद्दल मी आपली सदैव ऋणी राहीन. यापुढेही आपले सहकार्य मिळावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

‘‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपाशीर्वादामुळे मी महाराष्ट्र विधान परिषदेतील उपसभापती पदापर्यंत पोहोचली आहे. त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करून दाखवली’’ असे प्रतिपादन डॉ. नीलम गोर्‍हे यांनी विधान भवनातील पत्रकारांसमोर केले. महाराष्ट्र विधान परिषदेतील उपसभापती या त्यांच्या पदाला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांना चहापानासाठी आमंत्रित केले होते. त्याचवेळी हा सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव यांनी या सत्काराबद्दल डॉ. नीलम गोर्‍हे यांचे आभार मानले.

या कार्यक्रमप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, कार्यकारिणी सदस्य आत्माराम नाटेकर, राजेश खाडे, किरीट गोरे, अंशुमन पोयरेकर, तसेच विश्वस्त श्रीमती राही भिडे उपस्थित होत्या, तसेच टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव, उपाध्यक्ष राजेश माळकर, प्रवीण पाटील आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech