मुंबई – वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, मिहीर शाह हा लूक बदलून पलायन करण्याच्या प्रयत्नात होता. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा युक्तीवाद पोलिसांचा न्यायालयात केला आहे. आरोपीला कोणी मदत केली याचा तपास करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कोठडी देण्याची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती. तसेच गाडीची नंबर प्लेटही गहाळ असून तिचा शोध घ्यायचा आहे. त्यानंतर न्यायालयाने मिहीरला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, मिहीरनं केलेला गुन्हा अतिशय गंभीर आहे. त्यासाठी लहान मोठ्या गोष्टी तपासायच्या आहेत. आरोपी हा पळून गेल्यानंतर त्यानं आपली ओळख बदलण्याचा प्रयत्न केला. कारमध्येच त्यानं स्वतःची दाढी केली, केस कापले. या घटनेच्या तपासासाठी महत्वाचे असलेले सीसीटीव्ही देखील आरोपी डॅमेज करू शकतात. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी दिली पाहिजे. यात एका महिलेचा अतिशय निर्घृणपणे मृत्यू झाला आहे.
Worli Hit and Run accused Mihir Shah police custod