ठाणे – चालू जून महिन्यात अनेक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. जून महिन्यात बटाटे, कांदा, टोमॅटोनंतर डाळींचे भावदेखील वाढले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबई, दिल्लीसह हरभरा डाळीच्या किमतीत ११ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. त्याचबरोबर तूर आणि उडदाच्या दरातही ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांना ऐन पावसाळयाच्य सुरुवातीला महागाईचा तडका सहन करावा लागत आहे. आधीच भाजीपाल्याचे दर गगनाला मिळाले आहेत. त्यात डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत.
जून महिन्यात डाळींच्या किमतीत वाढ झाली आहे. जून महिन्यात बटाटे, कांदा, टोमॅटोसह डाळींच्या दरात वाढ झाली. मुंबईत हरभरा डाळीच्या दरात ११ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्याचबरोबर कांद्याच्या भावात ६७ टक्क्यांनी वाढ झाली. तूर, उडीद, मूग डाळींच्या दरातही वाढ झाली. देशातील बटाटे, कांदा आणि टोमॅटोच्या सरासरी दरांवर नजर टाकली तर सर्वाधिक वाढ टोमॅटोमध्ये झाली. टोमॅटोच्या दरात ३१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्याचबरोबर हरभरा आणि तुरीच्या दरातही सरासरी २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ३१ मे रोजी हरभरा डाळीची किंमत ८६.१२ रुपये प्रतिकिलो होती. ज्यात २.१३ टक्के म्हणजेच १९ जूनपर्यंत १.८४ रुपयांची वाढ झाली. आज डाळीची किंमत ८७.९६ रुपये झाली आहे. ३१ मे रोजी तूर डाळीची किंमत १५७.२ रुपये प्रतिकिलो होती. त्यात १९ जूनपर्यंत ४.०७ रुपये म्हणजेच २.५८ टक्के वाढ झाली. तूर डाळीचा भाव १६१.२७ रुपये प्रतिकिलो झाला. उडीद डाळीच्या सरासरी दरात फारशी वाढ झालेली नाही. आकडेवारीनुसार ३१ मे रोजी १२५.७९ रुपये किंमत होती. ती वाढून १२६.६९ रुपये प्रतिकिलो झाली आहे. म्हणजेच या कालावधीत ०.९० रुपयांची म्हणजेच ०.७१ टक्के वाढ झाली.
जून महिन्यात मूग डाळीच्या सरासरी दरात किंचित वाढ झाली. ३१ मे रोजी त्याची किंमत ११८.३२ रुपये होती. १९ मेपर्यंत ११९.०४ रुपये प्रतिकिलो झाली. म्हणजेच या कालावधीत किमतीत ०.७२ रुपयांची म्हणजेच ०.६० टक्के वाढ झाली. देशात मसूरच्या सरासरी किमतीत ०.२२ रुपयांनी म्हणजेच ०.२३ टक्के वाढ झाली. त्यामुळे ३१ मे रोजी ९३.९ रुपये असलेली किंमत वाढून ९४.१२ रुपये झाली.