उमटे धरणाच्या भिंतीला भगदाड, तातडीने दुरुस्त करणार

0

रायगड – तालुक्यातील उमटे धरणाच्या भिंतीला भगदाड पडले आहे. तसेच धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच बैठक घेत धरणाचे मजबुतीकरण तसेच गाळ काढण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी शुक्रवारी (21 जून) उमटे धरणाची पाहणी केली. यावेळी धरण मजबुतीकरण तसेच गाळ काढण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. तसेच यावेळी धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी निधी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उमटे धरणाची निर्मिती 1978 मध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर 1995 मध्ये हे धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आले. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर, धरणाची उंची 56.40 मीटर आहे. धरणाच्या पाण्यावर 47 गावे व 33 आदिवासी वाड्यांची तहान अवलंबून आहेत. त्यामुळे अलिबाग तालुक्यासाठी या धरणाला खूप महत्त्व आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech