दिव्यात फुटलेली पाइपलाइन तातडीने दुरुस्त

0

(अमित जाधव)
दिवा : दिवा शहरातील दिवा-आगासन रस्त्यावरील गणेशपाडा रोडची पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची उपशाखा असलेली लाईन फुटून पाणी गळती झाल्याची घटना रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली होती. प्रसंगी गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याने काही भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता.

दिवा अगासान या मुख्य रस्त्यावर पाणीपुरवठा करनारी ४०० मी मी व्यासाची मुख्य पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे सदर लाईनची उपशाखा असलेली २०० मी मी व्यासाची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली होती. याच रस्त्यावर तीन ते चार वेळेस पाईपलाईन फुटण्याचे प्रकार झाले आहेत.

प्रसंगी सदर माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद केला परिणामी जुनी पाणीपुरवठा सुरु असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद झाला नाही. गणेशपाडा, श्लोक नगर, दळवी नगर या भागातील संपूर्ण पाणीपुरवठा बंद झाला होता. परिणामी दिवेकरांना काही भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. अखेर पाणी पुरवठा विभागाने युद्ध पातळीवर काम सुरु केले व साधारण दहा तासानंतर काम पूर्ण झाले व पाणी पुरवठा कमी दाबाने सुरु करण्यात आला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech